कोर्लई,ता.२८(राजीव नेवासेकर)अलिबाग तालुक्यातील नामदेव नगर सांबरी येथील सामाजिक कार्यकर्ते स्व.सिताराम शेठ यांच्या पत्नी सामाजिक कार्यकर्त्या कुसूमताई यांचे त्यांच्या वयाच्या ९५ व्या वर्षी शुक्रवार दि. २० सप्टेंबर२०२४ रोजी अल्पशा आजाराने राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.
कुसूम ताईंची जनमानसात एक चांगली प्रतिमा होती.त्या नेहमी गोरगरीब अडल्या नडल्यांना मदत करीत असत.सर्पदंश , विंचूदंश यांवर त्या औषध देत असत.त्यांच्या पश्यात सहा मुलगे,एक मुलगी,सूना,नातू पणतू असा मोठा परिवार आहे.त्यांचे चिरंजीव सुहास,आनंद (राजू) हे उच्च पदस्थ सेवानिवृत्त शासकीय अधिकारी आहेत.त्यांचा दशक्रिया विधी व उत्तरकार्य रविवार दि.२९ सप्टेंबर २०२४ रोजी होणार असल्याचे निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या