
मुरुड शहरासह तालुक्यात सामाजिक राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात गेल्या तीन-चार वर्षांपासून व्हेंचर फाऊंडेशन मध्ये महाराष्ट्र महासचीव, जिल्हा उपाध्यक्ष पदी, वाहतूक सुरक्षा दल व नागरिक संरक्षण (आर.एस.पी.)संघटनेमध्ये त्यांनी आपले योगदान दिले आहे.
व्हेंचर फाऊंडेशनच्या माध्यमातून कोरोना महामारीत आपली व आपल्या कुटुंबियांची पर्वा न करता अविरतपणे रुग्णसेवा देणा-या डॉक्टर्स, परिचारिका, होमगार्ड,शिक्षक,आर.एस.पी.पदाधिकारी, पथक अधिकारी,हाॅटेल व्यावसायिक, होमगार्ड तसेच मुरुड तहसीलदार, महसूल विभाग व पुरवठा अधिकारी,कर्मचारी यांच्या अविरत सेवेची दखल घेऊन त्यांना मेडल व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात तसेच गोरगरीब आदिवासी बांधवांना ब्लॅंकेटचे वाटप तसेच तालुक्यातील नांदगाव,शिघ्रे व मुरुडमध्ये मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर आदी.कार्यक्रमात तुफैल दामाद यांची महत्त्वाची भूमिका होती.त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन शासनाच्या नागरी संरक्षण दलाच्या मुरुड विभागीय क्षेत्ररक्षक पदी ही निवड करण्यात आली आहे.त्यांच्या या निवडीचे संस्थेचे पदाधिकारी, अधिकारी, सदस्य,आप्तेष्ट, मित्रपरिवाराकडून अभिनंदन व कौतुक होत आहे.
(फोटो घेणे)
_______________________________________________________
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या