Type Here to Get Search Results !

मुरूडच्या श्री काळभैरव नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न


कोर्लई,ता.१८(राजीव नेवासेकर) मुरुडच्या श्री काळभैरव नागरी सहकारी पतसंस्थेची ३० वी  वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार १५ ऑगस्ट रोजी भंडारी बोर्डिंग सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाली.

     सुरुवातीला सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात येऊन श्री काळभैरवाच्या प्रतिमेस संस्थेचे चेअरमन दीपक पालशेतकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या पतसंस्थेचे संस्थापक स्व. संतोषभाई तवसाळकर यांच्या स्मृतीला उजाळा देत पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले . 

    संस्थेच्या व्हाईस चेअरमन स्नेहा पाटील,सेक्रेटरी निवास रसाळ, कोषाध्यक्ष सुरेश कासेकर,सदस्य प्रतीक पेडणेकर,दिपक मयेकर, मनोहर कासेकर,उषा खोत,तज्ञ सदस्य सुप्रेश खोत, आशिष नागवेकर व कायदेशीर सल्लागारॲड .अजित चोगले,रुपेश पाटील व कर्मचारी वृंद आणि सभासद यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सभेला सुरुवात झाली संस्थेचे चेअरमन दिपक अनंत पालशेतकर यांनी प्रास्ताविक केले. मागील सन 2023 - 24 या वर्षातील संस्थेचा  आर्थिक  अहवाल ताळेबंद नफा-तोटा पत्रक सादर केले तसेच आपल्या संस्थेची स्वतःची नवीन इमारत असावी याकरिता जागा खरेदी करण्याच्या प्रयत्नात आहेत. 

        सोनेतारण व प्रकल्प कर्ज चालू वर्षात सुरू करणार,संस्थेला गेली १० वर्षात ऑडिट वर्ग *_"अ "_* प्राप्त झाले असल्याने कर्जाची मर्यादा वाढवत आहोत. त्याचप्रमाणे आपल्या संस्थेची पहिली नवीन शाखा बोर्ली - मांडला येथे सुरू करण्याच्या विचाराधीन आहेत. सर्व सभासदांना भाग  मोठ्या प्रमाणात खरेदी करण्याबाबत सांगितले . सभेचे सूत्रसंचालन सदस्या उषा खोत यांनी केले. त्यानंतर उपस्थित सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांचे निरसन संस्थेचे चेअरमन आणि संचालक यांनी केले.यावेळी उपस्थित सभासदांना भेटवस्तू देण्यात आली.प्रतिक पेडणेकर यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर