Type Here to Get Search Results !

ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्या नंतर रविवारी काशिद बीचवर पर्यटकांची रेलचेल !

कोर्लई,ता.१८(राजीव नेवासेकर) पर्यटनात जगाच्या पटलावर नावारूपाला आलेल्या काशिद बीच पावसाळ्यात दोन महिन्यांनंतर १५ ऑगस्ट ला सुरु झाल्यावर रविवारी समुद्रकिना-यावर पर्यटकांची रेलचेल दिसून येत होती.

  काशिद-बिच समुद्र किनारा भरतीच्या वेळेस फेसाळणारे पाणी, उसळणाऱ्या लाटा, किनाऱ्यावरील शुभ्र वाळू येथे पर्यटकांना आकर्षित करते.पर्यटकांच्या सोयी-सुविधात याठिकाणी असलेली स्पीडबोट, पँरेसेलिंगबोट,बनाना, बंफर तसेच घोडा-उंटावरील सफर पर्यटनाचा आनंद द्विगुणीत करते.याठिकाणी विविध खाद्य-पेय चहा-नाष्टा सोयी सुविधा उपलब्ध आहेत. याठिकाणी दर शनिवार, रविवार तसेच सुटीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देत असतात. रस्त्यावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. वेळप्रसंगी ट्रँफिक जँमलाही सामोरे जावे लागते. देश-विदेशातील पर्यटक देखील आवर्जून भेट देत असतात.

     पर्यटकांच्या सुरक्षेसाठी लाईफ गार्ड,स्थानिक,स्टाँलधारक ,ग्रामपंचायत चे सहकार्य लाभते. पोलीस ही आपली कामगिरी उत्तम प्रकारे पार पाडतात.ग्रामपंचायत तसेच डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, श्रीसदस्य, विविध सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून या ठिकाणी वेळोवेळी स्वच्छता अभियान राबविण्यात येत असल्याने समुद्र किनारा चकाचक करण्यात येत असतो.पावसाळ्यात दोन महिन्यांनंतर १५ ऑगस्टला काशिद बीच सुरू झाल्यावर रविवारी समुद्रकिनारी पर्यटकांची रेलचेल दिसून येत होती.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर