कोर्लई,ता.६(राजीव नेवासेकर)रायगड जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनेनुसार महसूल पंधरवडा अंतर्गत *"एक हात मदतीचा दिव्यांग कल्याणाचा "* या उपक्रमांतर्गत मुरुड शहरातील ग्रामीण रुग्णालयाच्या *एल.के.बी हाॅस्पीटल* मध्ये वैद्यकीय अधीक्षक डॉ.उषा चोले यांच्या मार्गदर्शनाखाली दि.05 ऑगस्ट 2024 रोजी "दिव्यांग व्यक्तींसाठी तपासणी शिबिर व प्रमाणपत्र वितरण"कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी इतर अनुषंगिक लाभ देण्यात आले
मुरुड तहसीलदार श्री.रोहन शिंदे मान्यवरांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन करण्यात आले.शिबिरात तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात येऊन मोफत औषधे देण्यात आली.या शिबीराचा तालुक्यातील ६२ लाभार्थ्यांनी लाभ घेतला
ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. उषा चोले,डॉ.शेखर वानखेडे डॉ.प्रफुल्ल धुमाळ व रुग्णालयीन इतर अधिकारी व कर्मचारी यांनी शिबिराच्या यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या