कोर्लई, ता.६ (राजीव नेवासेकर ) मुरुड तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायत हद्दीतील आडीपांगाळे येथे मनोज साखरकर यांच्या राहत्या घरी आढळून आलेल्या दहा फुटी अजगराला सर्पमित्र संदीप यांनी वनविभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियांका पाटील व वनपाल संतोष रेवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या कौशल्याने पकडून वनविभागाच्या सहकार्याने जवळील जंगलात सोडून जिवदान दिल्याबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
नांदगाव येथील आडीपांगाळे येथे मनोज साखरकर यांच्या राहत्या घरी अजगर असल्याची माहिती काल रात्री आठच्या सुमारास सर्पमित्र संदीप घरत व वनविभागाच्या वनपाल संतोष रेवणे,(मुरुड), वनरक्षक किरण गायकर(आगरदांडा), वनरक्षक चेतन चव्हाण,विशाल ढोबळे, महिमा तराळ तसेच दिनेश रोटकर समजताच टिम घटना स्थळी दाखल होऊन २५ किलो वजनाच्या दहा फुटी अजगराला आपल्या कौशल्याने पकडून जवळील जंगलात दूरवर सुरक्षित पुणे सोडून जिवदान दिल्याबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.दरम्यान या अजगराने याठिकाणी ९ कबुतरे खाल्ल्याचे समजते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या