Type Here to Get Search Results !

मुरुड तालुक्यात सर्व्हरवर डाऊनमुळे धान्य वितरण सेवा खंडित : रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेने घेतली तहसीलदारांची भेट * सर्व्हरवर सेवा पुर्ववत सुरु करण्याची मागणी

कोर्लई,ता.५(राजीव नेवासेकर) मागील महिन्याच्या पंधरवड्यापासून सर्व्हरवर डाऊनमुळे रास्त भाव धान्य वितरण सेवा वारंवार खंडित होत असून याचा रास्त भाव धान्य दुकानदार व शिधापत्रिका धारकांना त्रास सहन करावा लागत असून सर्व्हरवर सेवा लवकरात लवकर पुर्ववत व सुरळित मिळावी.अशी मागणी रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष गिरीश साळी यांनी तहसीलदार रोहन शिंदे यांच्याशी चर्चा करताना केली.यावेळी तालुक्यातील सर्व रास्त भाव धान्य दुकानदार उपस्थित होते.

   जुलै महिन्याच्या १८ तारखेपासून तालुक्यात रास्त भाव धान्य वितरणात पॉज मशीन वारंवार बंद पडत असल्याने धान्य वाटपात अडचणी येत असून यामुळे शिधापत्रिका धारकांना तासंतास ताटकळत उभे राहावे लागते आहे.वेळप्रसंगी पावती साठी नंबर जवळ आला असता सर्व्हरवर डाऊनमुळे मशीन बंद पडल्यास मशीन सुरू होईपर्यंत नाही तर दुस-यादिवशी पुन्हा रांगेत उभे राहावे लागत असल्याने नाराजीचा सूर दिसून येत आहे.याचा रास्त भाव धान्य दुकानदार व शिधापत्रिका धारकांना त्रास होत असल्याने तालुका रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष गिरीश साळी यांनी सर्व रास्त भाव धान्य दुकानदारांसमवेत तहसीलदार यांची भेट घेऊन सर्व्हरवर सेवा लवकरात लवकर पुर्ववत व सुरळित मिळावी.अशी मागणी केली.

   तालुक्यातील धान्य वितरणात सर्व्हरवर डाऊनचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल व कोणीही पात्र लाभार्थी धान्यापासून वंचित राहाणार नाही.असे तहसीलदार रोहन शिंदे यांनी यावेळी सांगितले.

________________________________________

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर