कोर्लई,ता.२५(राजीव नेवासेकर)मुरुडच्या अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्स मुरुड जंजिरा महाविद्यालयामध्ये जागतिक डास दिवसाचे औचित्य साधून प्राणिशास्त्र विभाग, राष्ट्रीय सेवा योजना आणि डी. एल. एल.ई विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मुरुड शहरातील शाळांमध्ये डासांपासून होणारे आजार यांच्यावर आधारित जनजागृती अभियान राबविण्यात आले.
या अभियानाअंतर्गत दिनांक २३ ऑगस्ट २०२४ रोजी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अंजुमन इस्लाम जंजिरा प्रायमरी शाळेचे इयत्ता ३ व ४ थीच्या विद्यार्थ्यांना तसेच दिनांक २४ ऑगस्ट २०२४ रोजी आंगणवाडी व नगरपरिषद मराठी शाळा चे इयत्ता १ ते ७ विच्या विद्यार्थ्यांना सुद्धा डासांपासून होणारे विविध आजारांविषयी माहिती देण्यात आली.
या जनजागृती अभियानाच्या यशस्वीतेसाठी प्र. प्राचार्य डॉ. साजिद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली प्राणिशास्त्र विभाग प्रमुख प्रा.जावेद खान,राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा. डॉ. फिरोज शेख, डी. एल. एल.ई विभाग प्रमुख प्रा. रहीम बागवान यांनी तर विद्यार्थ्यांमध्ये हवालदार खानसा, दरोगे जैनब, कुरवले इकरा, कुरेशी शिफा, जमादार अमिना, मुकरी सानिया, पांगारकर अय्यान, हमदुले सलवा यांनी विशेष परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या