कोर्लई, ता.२८ (राजीव नेवासेकर ) मुरुडमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)शहर शाखेतर्फे हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ मुरुड बाजारपेठेत गेली पंधरा वर्षे खास महिलांसाठी मानाची दहीहंडी बांधण्यात येते. ही दहीहंडी यंदाही श्रीकाळभैरव गोविंदा पथकाने फोडून ट्रॉफी मिळविली.यावेळी शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.त्यांच्या हस्ते मानाचा चषक देण्यात आला.आजच्या दहीहंडी उत्सवात शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती.शहरातील पुरकर नाका येथे दहीहंडी उत्सवात महिलांच्या श्री काळभैरव गोविंद पथकासोबत त्यांनी गोविंदाच्या ठेक्यावर ताल धरून महिलांसमवेत घेर धरल्याने महिला गोविंद पथकाचा आनंद द्विगुणित झाला.
श्री कालभैरव भंडारी महिला गोविंदा पथकांची स्थापना पंधरा वर्षांपूर्वी करण्यात आली.या गोविंदा पथकाचे संस्थापक माजी नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांनी केली. पूर्वी भंडारवाडा मर्यादित हा गोविंदा पथक होता. आता मात्र मुरुड मधील सर्व जातीच्या महिला यात सहभागी होतात. या महिलांचा उत्साह पाहून गेले पंधरा वर्षापासून शिवसेनेच्या वतीने मुरुड बाजारपेठेतील दहीहंडीचे आयोजन तालुका संघटक कुणाल सतविडकर हे करत आले आहेत. गेली नऊ वर्ष महिला गोविंदा पथक ही दहीहंडी फोडून ट्राॅफी मिळवित आहेत.गोविंदा महिला पथकासाठी प्रशिक्षक समीर सुर्वे हे मेहनत घेत आहेत. या गोविंदा पथकासाठी भंडारी समाजाचे मोठे सहकार्य लाभले. यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(फोटो घेणे)
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या