कोर्लई,ता.२४(राजीव नेवासेकर)बदलापूर येथील चिमुरडीवर झालेला अनामुष अत्याचाराचा निषेध आणि नराधमाला तात्काळ फाशी द्या.अशी मागणी करत मुरुड मधील महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुका प्रमुख नौशाद दळवी यांच्या नेतृत्वाखाली मुरुड शहरातील पुरकर नाका येथे काळे झेंडे दाखवून व काळ्याफिती बांधून जोरदार निदर्शने केली. भर पावसात ही निदर्शने करण्यात येत होती. बदलापूर येथील एका शाळेत १३ ऑगस्ट रोजी अत्यंत लहान मुलींवर शाळेतील सफाई कामगाराने अमानुष अत्याचार केले. ही घटना उघडकीस येताच संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मात्र न्यायालयाच्या आदेशामुळे बंद मागे घेण्यात आला. परंतु जागोजागी मूक निदर्शने करण्याचा निर्णय महाविकास आघाडीकडून घेण्यात आला होता. त्यानुसार मुरुड मध्ये महाविकास आघाडी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुका प्रमुख नौशाद दळवी, बाळकृष्ण गोंजी,अमित गोंजी रुपेश मुळेकर, रुपेश जामकर, संतोष सावंत, हाफिज कबले, दिपाली जामकर, राहील कडून,राजा सोडेकर, अलिबाग -मुरुड मतदार संघ संपर्क प्रमुख प्रमोद भायदे, शहर प्रमुख आदेश दांडेकर, तालुका संघटक कुणाल सतविडकर, कॉंग्रेस महिला तालुका अध्यक्षा वासंती उमरोटकर, इस्माईल शेख, अस्लम हलडे, नांदगाव सरपंच सेजल घुमकर, विक्रांत कुबल महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
बदलापूर घटनेच्या निषेधार्थ मुरुड मध्ये महाविकास आघाडीची जोरदार निदर्शने
ऑगस्ट २४, २०२४
0
Tags
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या