कोर्लई ,ता.५(राजीव नेवासेकर) रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर यांनी पत्रकारिते बरोबर मोलाचे सामाजिक काम केलेआहे. जिल्ह्यासाठी स्वतंत्र कामागार न्यायालय,स्वतंत्र पासपोर्ट कार्यालय व स्वतंत्र दूरसंचार कार्यालय त्यांच्या लेखणीच्या फटका-यानी सुरू झाली आहेत. सागरगड -माचीच्या आदिवासींनाही भौतिक सुविधा साठींसाठी १० एकर जमीन शासनाकडून मिळवून दिली आहे.
त्यांचे हे कार्य वाखाणण्याजोगे असून त्यांचा आदर्श इतरांनी घ्यावा.असे आवाहन खासदार सुनिल तटकरे यांनी केले.
बळवंत वालेकर लिखित "बळवंत मी, यशवं
त मी" या पुस्तकाचे प्रकाशन करताना ते अलिबाग येथे बोलत होते.ज्येष्ठविधीज्ञ व जिल्ह्याचे माजी सरकारी वकील गोपाळराव लिमये यावेळी अध्यक्षस्थानी होते.
रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे,जिल्हा परिषदेचे ॲड.सी.ई.ओ.सत्यजित बडे,कोकण विभागाचे माहिती व जनसंपर्क उपसंचालक गणेश मुळे यांचा शुभसंदेश यावेळी वाचले गेले.
सदरवेळी ज्येष्ठपत्रकार बळवंंत वालेकर यांच्या प्रास्ताविकानंतर आमदार महेंद्रशेठ दळवी,माजी आयुक्त दिलीप पांढरपट्टे,(I, A. S.) गौळी समाजाचे अध्यक्ष राजेश मेहतर,कुमार आर्यन वालेकर तसेच ज्येष्ठ विधीज्ञ गोपाळराव लिमये यांनी आपले विचार मांडले. बळवंत वालेकर यांच्यातर्फे नवनिर्वाचित खासदार सुनिलजी तटकरे यांचा मानपत्र,स्मृतिचिन्ह व भेटवस्तु देऊन करण्यात आला तर ज्येष्ठपत्रकार बळवंत वालेकर यांचा सन्मान विविध संस्थांनी केला, यामध्ये यादव चौली गवळी समाज (रायगड,ठाणे, मुंबई,सोलापूर)अलिबाग तालुका शिक्षण प्रसारक मंडळ,ज्येष्ठ नागरिक संस्था वाघोली,रायगड जिल्हा माध्यमिक शाळा निवृत्त मुख्याध्यापक मंच अलिबाग) ,को. ए. सो. निवृत्त मुख्याध्यापक मंच - अलिबाग,ग्रामस्थ मंडळ महाळुंगे (मुरुड)यांचा समावेश होता.
कार्यक्रमास आदर्श पतसंस्थेचे संस्थापक सुरेश पाटील,कमळ पतसंस्थेचे संस्थापक गिरीष तुळपुळे , सावतामाळी पतसंस्थेचेअध्यक्ष रमेश नाईक,डॉ. चंद्रकांत वाजे, डॉ.डी.सी.शिवकर,ॲड.विलास नाईक , ॲड.प्रमोद पाटील,गौळी समाजाचे सेक्रेटरी प्रफुल्ल वालेकर,हर्षल पाटील,अनंत गोंधळी इ.विविध क्षेत्रातील हितचिंतक उपस्थित होते.
कार्यक्रमात राजाराम भगत गुरुजी यांनी ईशस्तवन व राष्ट्रगीत सुरेल आवाजात म्हटले. सुत्रसंचालन खोपोली येथील जिद्द चे कार्यकारी संपादक रविंद्र घोडके यांनी तर सहयोग पतसंस्थेचे अध्यक्ष योगेश मगर यांनी आभार मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या