अलिबाग,ता.१३(नागेश कुळकर्णी)ग्रंथालय ही एक सामाजिक संस्था असून समाजाच्या हितासाठी ग्रंथालयाचे संवर्धन करणे आवश्यक आहे. ग्रंथालयाचे जतन करणाऱ्या ग्रंथपाल हे ग्रंथालयातील महत्त्वाचे घटक असल्याचे प्रतिपादन कोकण मराठी साहित्य परिषदेचे अलिबाग शाखेचे सहकार्यवाह नंदु तळकर यांनी आज भारतीय ग्रंथालयाचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जन्मदिनानिमित्ताने प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालय व ता.ग्रंथालय अलिबाग येथील कार्यक्रमात केले.
सुरुवातीला सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात येऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.यावेळी डॉ. रंगनाथन यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालय व ता. ग्रंथालय अलिबागचे जेष्ठ संचालक ग्रंथमित्र नागेश कुळकर्णी आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे अलिबाग शाखेचे सहकार्यवाह नंदु तळकर यांच्या हस्ते डॉ.एस.आर.रंगनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक आर. के.घरत ,सार्वजनिक वाचनालय व जिल्हा ग्रंथालय अलिबागचे ग्रंथपाल भालचंद्र वर्तक ,प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालय व तालुका ग्रंथालय अलिबागचे ग्रंथापाल ज्योती म्हात्रे,किशोर ठाकरे आदी.मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालय व तालुका ग्रंथालय अलिबागचे ग्रंथपाल ज्योती म्हात्रे ह्या गेली अठ्ठावीस वर्षे चांगल्या प्रकारे ग्रंथपाल पदाची जबाबदारी सांभाळत असल्याने त्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या