Type Here to Get Search Results !

सार्वजनिक वाचनालय अलिबाग तर्फे ग्रंथपाल दिनानिमित्त ..... ग्रंथालय जनिक चळवळीचेर्वजनिक जनक डॉ. एस.आर. रंगनाथन यांना अभिवादन ..





अलिबाग,ता.१३(नागेश कुळकर्णी)भारतीय ग्रंथालय चळवळीचे जनक डॉ. एस. आर.रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक वाचनालय आणि जिल्हा ग्रंथालय अलिबाग येथे  भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली. 

     यावेळी सार्वजनिक वाचनालय आणि जिल्हा ग्रंथालयाचे जेष्ठ संचालक नागेश कुळकर्णी यांच्या हस्ते डॉ. एस.आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.यावेळी  सार्वजनिक वाचनालय आणि जिल्हा ग्रंथालय अलिबागचे ग्रंथपाल भालचंद्र वर्तक, सहाय्यक ग्रंथपाल सौ.रजिता माळवी, प्रकाश टेंबुलकर, अभय हातणकर,हेमंत राऊत अमित धुमाळ,सौ.अर्चना माळवी तसेच वाचकवर्ग या वेळी बहुसंख्येने उपस्थित होते.

 यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना जेष्ठ संचालक ग्रंथमित्र नागेश कुळकर्णी यांनी डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या ग्रंथालय चळवळीतील योगदानाबद्दल सांगितले की,ग्रंथालयाच्या विकासात डॉ. रंगनाथन यांचा फार मोठा वाटा आहे.देशातील सर्वसामान्यांना ज्ञानाची कवाडे विनामूल्य खुली करण्याचा विचार डॉ रंगनाथन यांनी रुजविला,नंतर तो जोपासण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य झिजवले.

    यावेळी सार्वजनिक वाचनालय आणि अलिबाग ग्रंथालयाचे ग्रंथपाल तसेच महाराष्ट्र शासनाचा ग्रंथमित्र पुरस्कार प्राप्त भालचंद्र वर्तक, सहाय्यक ग्रंथपाल सौ.रजिता माळवी यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर