कोर्लई,ता.१२(राजीव नेवासेकर)मुरुड तालुक्यातील नांदगाव येथे स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने अक्युपंक्चर योग-निसर्गोपचार हिलर - विजय चंद्रकांत तांबडकर यांचे मोफत आरोग्य मार्गदर्शन व उपचार शिबिर आयोजित करण्यात आले असून या शिबिरात तात्कालिक व जुन्या आजारांवर पारंपरिक,पूरक व पर्यायी चिकित्सा पध्दतीने उपचारासाठी ते मार्गदर्शनही करणार आहेत.
पारंपरिक, पूरक व पर्यायी चिकित्सा क्षेत्रात आपला ठसा उमटविणारे आणि याबाबत नुकताच प्लाटिनम वेलनेस आयकाॅन अवार्ड २०२४ ने सन्मानित झालेले अनुभवी अक्युपंक्चर,योग-निसर्गोपचार हिलर विजय चंद्रकांत तांबडकर यांचे खास लोकाग्रहास्तव स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट रोजी दुपारी ३ ते ६ दरम्यान श्री लक्ष्मीनारायण मंदिर, गणेश पाखाडी, श्री सिद्धिविनायक मंदिरा जवळ आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी आपली नावे व्हाटस्ॲप करून नोंदवावी. अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्र. 7208400201 वर संपर्क करावा व या शिबिराचा तालुक्यातील जिल्ह्यातील इच्छूकांनी लाभ घ्यावा.असे आवाहन विजय तांबडकर यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या