Type Here to Get Search Results !

मुरुडच्या चांद्रसेनिय कायस्थ प्रभु समाज व देवस्थान ट्रस्टतर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा




                         

कोर्लई,ता.४(राजीव नेवासेकर ) मुरुडच्या चांद्रसेनिय कायस्थ प्रभू समाज व देवस्थान ट्रस्टतर्फे   सी.के.पी समाजाच्या हाॅलमध्ये  सी.के.पी ज्ञाती बांधव विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला.
    सुरुवातीला श्री लक्ष्मीनारायण दैवताला वंदन करून समाज अध्यक्षा नैनिता कर्णिक यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात येऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
   चांद्रसेनिय कायस्थ प्रभू समाज व देवस्थान ट्रस्ट करीत असलेल्या विविध समाजोपयोगी कार्याची उपाध्यक्ष अशोक सबनीस यांनी आपल्या प्रास्ताविकात मनोगत व्यक्त करुन कार्यक्रमाची रूपरेषा सादर केली तर कार्यवाह संदेश मथुरे यांनी सभेच्या नोटीसचे वाचन केले.या कार्यक्रमाचे औचित्य साधून ज्येष्ठ पत्रकार नागेश कुळकर्णी यांची सी.के.पी समाज मध्यवर्ती संस्था दादर‌ येथे विश्वस्त म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदन करुन माजी अध्यक्ष सुनील कुळकर्णी, माजी उपाध्यक्ष मनोहर दिघे‌‌ यांच्या हस्ते श्रीफळ,शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले तसेच समाज अध्यक्षा नैनिता कर्णिक यांची सी.के.पी.समाज रायगड जिल्हा येथील कार्यकारिणीवर सहकार्यवाह म्हणून निवड झाल्याबद्दल स्नेहप्रभा महिला अध्यक्षा जयश्री प्रधान,कार्यवाह साक्षी नागले यांच्या हस्ते श्रीफळ शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.   पाककला स्पर्धेत  बक्षिस मिळवून समाजाची मान उंचावल्या बद्दल विशेष सत्कार म्हणून जयश्री प्रधान , सुचिता पोतनीस यांचा समाज अध्यक्षा नैनिता कर्णिक, कल्पना मथुरे,भारती मथुरे, सुषमा पोतनीस,साधना‌ सबनीस यांच्या हस्ते भेटवस्तू व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.बालवाडी ते उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव  सहकार्यवाह हरेष देशमुख,विश्वस्त विनय रा.मथुरे, राजेंद्र पोतनीस,विनय सो मथुरे, सुप्रिया मथुरे,   जेष्ठ पत्रकार नागेश कुळकर्णी,ज्ञाती बांधव‌ नयन कर्णिक, प्रफुल्ल दिघे, प्रफुल्ल कुळकर्णी,दीपा सबनीस यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. यावेळी नागेश कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  रोहन दिघे,भालचंद्र देशमुख, सुरेंद्र दिघे,सर्व विश्वस्त यांनी विशेष परिश्रम घेतले.उपाध्यक्ष अशोक सबनीस यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर