कोर्लई,ता.१६(राजीव नेवासेकर)आरोग्यासाठी व्यायाम हा एक उत्तम पर्याय आहेच. पण आजारांवर उपचारांसाठी व्यायाम उत्तम औषध ठरते यांची प्रचिती आज या शिबिरात आली. नांदगाव ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी यापुढेही अशी शिबीरे आयोजित करण्यात येतील.असे नांदगाव येथील लक्ष्मी नारायण मंदिर येथे आयोजित आरोग्य मार्गदर्शन व उपचार शिबिरा प्रसंगी ग्रामपंचायत सरपंच सेजल घुमकर यांनी सांगितले.
१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून आयोजित अक्युपंक्चर योग-निसर्गोपचार शिबिरात हिलर विजय चं. तांबडकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी या शिबिरात एक्युप्रेशर,व्यायाम, योग निसर्गोपचार आदि. माध्यमातून आपल्या शारीरिक समस्यांबाबत मार्गदर्शन व उपचार केले.
यावेळी उपसरपंच मेघा मापगांवकर, सदस्य विक्रांत कुबल,मंन्जूम घोले, जितु दिवेकर, विशाल पाटिल, नितेश रावजी, अस्लम हलडे,अनुशा पाटिल, जुबेर कुतकी, फरान तांडेल,केतन नाक्ती मान्यवर व आजुबाजूच्या परिसरातील ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घेतला.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या