Type Here to Get Search Results !

मुरुडच्या पोष्टात पाकिटे नाहीत : भाऊरायाला राखी पाठवायची कशी ?


कोर्लई,ता.१४(राजीव नेवासेकर)गेल्या दोन तीन महिन्यांपासून जिल्ह्यातील पोष्ट ऑफिसात पोस्ट पाकिटे मिळत नसल्याने सर्व सामान्य ग्राहकांची अडचण होत असून आगामी होणा-या रक्षाबंधन, राखी पौर्णिमा सणाला भाऊराया ला राखी कशी पाठवायची असा प्रश्न बहिणीला पडला नाही तर नवलच !

      मुरुड तालुक्यासह ग्रामीण भागातील पोष्टातून गेल्या दोन तीन महिन्यांपासून पाकिटे मिळत नसल्याने  सरकारी कामकाजात तसेच नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

   शासनाच्या डाक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची तातडीने दखल घेऊन जिल्ह्यातील, तालुक्यातील व ग्रामीण भागातील पोष्टातून पोष्ट पाकिटांची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.

     याबाबत आमच्या प्रतिनिधीने मुरुड मधील डाक विभागात कानोसा घेतला असता या पोष्ट पाकिटांची छपाई नाशिक येथील पी.एस.डी.मधे होत नसल्याने अलिबाग मुख्य डाकघर यांच्या कडे मागणी प्रमाणे पुरवठा होत नाही.त्यामुळे रायगड मधील ब-याच पोष्ट ऑफिसात पाकिटांचा पुरवठा होत नाही.असे येथील पोष्ट मास्तर सुग्रीव तोगरे यांनी सांगितले.

________________________________________________________


    सरकारी कामकाजात तसेच खासगी, नातेवाईकांना पाठवण्यासाठी पोष्ट पाकिटांची गरज भासते, परंतु गेल्या तीन महिन्यांपासून मुरुडच्या पोष्टात वारंवार विचारणा केली असता शिल्लक नसल्याचे तसेच नाशिक येथील पी एस डी मध्ये छपाई होत नसल्याने अलिबाग डाक विभाग कार्यालयात मागणी करुनही पाकिटांचा पुरवठा होत नसल्याचे सांगितले जाते.

                                                          -विजय पैर 

                              तालुका सचिव : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, मुरुड तालुका 

                                                           मुरुड-जंजिरा (रायगड).             ________________________________________________________


  सरकारी काम असो किंवा अन्य कामात पोष्ट पाकिटांची गरज नेहमी असते.मुरुडच्या पोष्टात तीन महिन्यांपासून पाकिटे मिळत नसल्याने अडचणीचे, त्रासाचे झाले आहे.काही दिवसांवर राखी पौर्णिमा असताना माझ्या सारख्या अनेक बहिणींना पोष्टात पाकिटे मिळत नसल्याने राखी पाठवण्यासाठी त्रासदायक ठरू शकते.यासाठी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन पोष्टात पाकिटे उपलब्ध करून द्यावीत.

                                                 ॲड.मृणाल खोत 

                                               मुरुड-जंजिरा,जि.रायगड


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर