कोर्लई,ता.११(राजीव नेवासेकर) अलिबाग -वडखळ राष्ट्रीय महामार्गाची खाच खळगे व खड्ड्यांमुळे अत्यंत दुरावस्था झाली असून शासन, राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाला वारंवार अर्ज,निवेदने देऊनही जाग येत नसल्याने अलिबाग येथील सामाजिक कार्यकर्ते खड्डे ॲक्टिव्हिस्ट दिलिप जोग कळंबोली येथील राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यालयासमोर स्वातंत्र्य दिनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार करीत असून याबाबत पनवेल राष्ट्रीय महामार्ग अभियंता ,तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि,वडखळ-अलिबाग, पळस्पे इंदापूर या राष्ट्रीय महामार्गाची खाच खळगे व खड्ड्यांमुळे अत्यंत दुरावस्था झाली असून याबाबत आपणाकडे वारंवार अर्ज निवेदने देण्यात येऊन देखील जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे कळंबोळी येथिल जे.एन.पी.टी. रोड टी. जंक्शन नजीकच्या कार्यालयासमोर दि. १५ ऑगस्ट २०२४ रोजी नाईलाजास्तव एक दिवसाचे लाक्षणीक उपोषण करीत आहे.अद्यापही रस्त्यावर योग्य सुधारणा झालेल्या नाहीत आणि अधिकारी केवळ टोलवाटोलवी करीत असतात. नेते दरवेळी भूलथापा देत असतात.
अलिबाग-वडखळ / NH166A / ची अवस्था अत्यंत वाईट आहे. सेंटमेरी हायस्कूल ते एच.पी.पंप / पिंपळभाट राऊतवाडी तीनवीरा स्टॉप ते चरी / पेझारी पोलिस चौकी पोयनाड नाका ते शहाबाज रोड फौजी धाबा-PNP JUNCTION - धरमतर पूल दोन्ही बाज वडखळ Flyover-एकच सर्विसरोड चालू / पेव्हरचे रस्ते पूढील सर्व सर्विस रोड अत्यंत वाईट अपघातमय भाग... रस्त्याच्या चौपदरीकरण तातडीने होणे गरजेचे आहे.
या रस्त्याच्या दुरूस्तीचे काम केले तरी पावसाळयातील पहिल्या महिन्यातच जैसे थे अवस्था होते. जिल्हा कॉंक्रिटचा दर्जा अत्यंत निकृष्ट असून ते मिक्सरमधून न आणता डंपरमधून आणले जाते. खात्याचा कोणीही अधिकारी कामावर कधीही हजर नसतो.साईडपट्यांची अवस्था अत्यंत वाईट असून रस्त्यामधील डीव्हायडर्स अत्यंत कमी उंचीचे आहेत. रस्त्याच्या डायव्हर्शनला योग्य साइन्स लावलेल्या नाहीत, त्यामुळे रस्त्यांवर,पूलांवर पाणी तुंबत्त आहे. सर्विस रोडची अवस्था अत्यंत खराब आहे.
वडखळ-अलिबाग, पळस्पे इंदापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेमुळे दैनंदिन जिवित व वित्त हानी ला सामोरे जावे लागत असून नागरिक,प्रवासी वाहनचालकांना याचा त्रास व हाल सहन करावे लागत आहेत.शासन, प्रशासनाला जाग येण्यासाठी १५ ऑगस्ट २०२४ स्वातंत्र्य दिनी N.H.A.I. च्या कळंबोली येथील कार्यालयासमोर नाईलाजास्तव एक दिवसाचे लाक्षणीक उपोषण करीत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते तथा खड्डे ॲक्टिव्हिस्ट दिलिप जोग यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या