कोर्लई,ता.३(राजीव नेवासेकर) मुरुडच्या वसंतराव नाईक महाविद्यालय व पद्मदुर्ग ढोल ताशा व ध्वज पथक यांच्या संयुक्त विद्यमाने ढोल ताशा व ध्वज पथकाचे प्रशिक्षण घेण्यात आले.
पद्मदुर्ग ढोल ताशा पथकाच्या स्नेहा बाथम
निष्णांत वादक यांनी विद्यार्थिनींना ढोल ताशा प्रशिक्षण दिले. ढोल ताशा पथक ही केवळ एक सांस्कृतिक परंपरा नसून आजच्या युगातील मॅनेजमेंटची भक्कम शाळा असल्याचे सांगितले.
प्रशिक्षणाला विद्यार्थी विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
वसंतराव नाईक महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. जनार्दन कांबळे, माजी प्रभारी प्राचार्य डॉ. विश्वास चव्हाण, राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख डॉ.एस. एस.भैरगुंडे, प्रा.डॉ.जी.डी. मुनेश्वर,सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.चिंतन पोतदार, प्रा.डॉ.एस एल म्हात्रे, प्रा. डॉ.एम.पी.गायकवाड, प्रा.डॉ.एम.एन.बागुल, प्रा. डॉ. सीमा नाहीद,प्रा.डॉ.प्रणव बागवे, प्रा.सिद्धेश सतविडकर,प्रा.मुस्कान रज्जाक, श्रद्धा उमरोटकर व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यावेळी उपस्थित होते.
वसंतराव नाईक महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींना चांगल्याप्रकारे प्रशिक्षण दिल्याबद्दल प्रभारी प्राचार्य डॉ.जनार्दन कांबळे व महाविद्यालय विकास समितीने पद्मदुर्ग ढोल ताशा व ध्वज पथकाचे आभार मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या