कोर्लई.२(राजीव नेवासेकर) शासनाच्या महसूल विभागाने केलेल्या कामकाजाचा आढावा जनतेसमोर ठेवण्याकरिता महाराष्ट्र शासन निर्णय दिनांक 30 जुलै २०२४ अन्वये महसूल विभागामार्फत राज्यात 1 ऑगस्ट पासून महसूल पंधरवडा-२०२४ साजरा करण्यात येत आहे.त्याचाच भाग मुरुडच्या तहसील कार्यालयातर्फे तहसीलदार रोहन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्स महाविद्यालयामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणी बाबत प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये तहसीलदार रोहन शिंदे यांनी विद्यार्थ्यांना या योजनेची माहिती दिली व मार्गदर्शन करुन विद्यार्थ्यांना लागणाऱ्या विविध दाखल्यांचे अर्ज दाखल करून घेऊन दाखल्यांचे वाटप करण्यात आले. नायब तहसीलदार संजय तवर,मंडळ अधिकारी खुशाल राठोड तसेच तलाठी रुपेश रेवसकर,रेश्मा विरकुड,सपना वायडे,पूजा विरकुड व राहुल जाधव आणि महाविद्यालयाचे प्रा. अल्ताफ फकीर, प्रा, जावेद खान मणियार, प्रा. निदा गोरमे, प्रा. सानिका लोटनकर मान्यवर उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या