Type Here to Get Search Results !

जयपाल पाटील यांना आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संमेलनासाठी खास आमंत्रण !


 कोर्लई,ता.२४(राजीव नेवासेकर)शिक्षणाच्या भविष्यावर जगभरातील शैक्षणिक नेत्यांची 3 दिवसाची वैचारिक,शिक्षण आणि कौशल्य. या विषयावरील चर्चा इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्सपोसेंटर नवी दिल्ली येथे दिनांक 18 ते 20 /2024 सप्टेंबरला होणाऱ्या या संमेलनासाठी आपत्ती व्यवस्थापन तज्ञ,प्रा.डॉ.जयपाल पाटील यांना आयोजकांनी खास आमंत्रण दिले आहे. 

     डॉ. जयपाल पाटील यांच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या विशेष अभ्यासामुळे 4थी मुंबई व 5वी दिल्लीत झालेल्या  जागतिक  आपत्ती परिषदेत विशेष प्रतिनिधि म्हणुन  आमंत्रित करण्यात  आले होते,रस्त्यावर  होणारे "2 चाकी,मोटरसायकल" अपघाता बाबत सुरक्षाचा शोध निबंध पहिल्या व "कोविड नंतर काय?"या वरील दुसऱ्या जागतिक  परिषदेत सादर केला,यामुळेच ते या क्षेत्रात जगप्रसिद्ध  झाले तर जवाहरलाल नेहरू विद्यापीठात  भारतातील आपत्तीव्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञांना आमंत्रित केले असता "जंगलातील आगीबाबत" शोध निबंध सादर केला.सध्या  जागतिक  वातावरण  बदल होत असल्याने देशभरातील 12वी नंतरच्या सर्व मुला-मुलींना एन.सी.सी.व आपत्तीव्यवस्थापनचे सिव्हिल डिफेन्स चे प्रशिक्षण देण्यात यावे.अशी मागणी त्यांनी देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.त्या बरोबर लातुर,गुजरात, आता वायनाड येथील आपत्तीवेळी "हॅम रेडिओ" ने ऊत्तम काम केले यासाठी तहसील व पोलीस स्टेशन मधे "हॅम रेडिओ"  सेंटर करावेत.अशी मागणी केली असून  आतापर्यंत 562 प्रत्यक्ष व्याख्याने तरआकाशवाणी मुंबई,रत्नागिरी,कोल्हापूर, सोलापूर आणी पुणे येथून लाखो नागरिकांना प्रशिक्षण दिले असल्यामुळे आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संमेलनास आमंत्रित केले आहे.सध्या ते रायगड जिल्हा परिषदेतील 808 ग्रामपंचायत मधे आपत्तीव्यवस्थापन व सुरक्षेबाबतग्रामस्थांनां धडे देत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर