श्रावण महिन्यात पावसाचे प्रमाण कमी होऊन हवामानात मोठ्या प्रमाणावर उष्णता निर्माण झाली होती तर ३६ अंशाच्या वर पारा चढला होता.
उष्णतेच्या काहिलीने अनेकांनी घरातच राहाणे पसंत केले होते.त्यामुळे बाजारपेठेत तुरळक प्रमाणात गर्दी दिसून येत होती.
आज सकाळी पडलेल्या उन्हानंतर दुपारच्या वेळी हवामानात बदल होऊन प्रचंड उकाड्या नंतर श्रावण धारा बरसल्याने मुरुडकरांना दिलासा मिळाला.या श्रावणधारांमुळे शेतातील भात पिकालाही जिवदान मिळाले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या