कोर्लई,ता.२१(राजीव नेवासेकर) मुरुड येथील तालुका विधी सेवा समिती व वकील संघ यांच्या सुयुक्त विद्यमाने ओंकार विद्यालयात कायदेविषयक मार्गदर्शनपर शिबीर घेण्यात आले.
सुरुवातीला सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात येऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.यावेळी
रॅगिंग विरोधी कायदा (Anti Raging Law), स्त्री भ्रूण हत्या, हुंडा प्रतिबंधक कायदा याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.ॲड.अजित चोगले यांनी रॅगिंग विरोधी कायदा (Anti Raging Law) या विषयावर मार्गदर्शन केले.ॲड.डी. एन. पाटील यानी स्त्री भ्रूणहत्या विरोधी कायदा (Pre-Conception Pre-Natal Diagnostic. Techniques Act-1994 याबाबत मार्गदर्शन केले तर ॲड.मनाली सतविडकर यांनी हुंडा प्रतिबंधक कायदा (Dowry Prohibition Act) या कायद्याबाबत माहिती दिली.
तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश घन:शाम तिवारी,(क.स्तर) यांनी शाळा महाविद्यालयात होणारी रॅगींग, त्याचा विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम, त्याबाबत कायदेशीर तरतूदी, समाजातील स्त्री भ्रूणहत्येची समस्या, त्यासंबंधी कायदा व हुंडा प्रतिबंधक कायदा व सदर गुन्ह्यांसाठी होणारी शिक्षा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष व दिवाणी न्यायाधीश घन:शाम तिवारी(क.स्तर) वकील संघाचे अध्यक्ष ॲड .एस. जी. जोशी, सचिव ॲड .डी. एन. पाटील, ॲड.अजित चौगले, ॲड.मनाली सतविडकर तसेच ओंकार विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रणिता गार्डी, शिक्षिका रोशनी गार्डी, सारीका कवळे तसेच विद्यालयाचे कर्मचारी वृंद, विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती माळी, ओमकार इंगळे, म्हात्रे कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले तर सारीका कवळे यांनी आभार मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या