Type Here to Get Search Results !

लाडकी बहीण योजना कार्यक्रमासाठी मुरुड आगारातील लांब पल्ल्याच्या फेऱ्या दोन दिवसासाठी रद्द ! शालेय विद्यार्थी व प्रवाशांचे प्रचंड हाल

कोर्लई,ता.२० (राजीव नेवासेकर) रत्नागिरी येथे दि.२१ ऑगस्ट रोजी होणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी मुरुड आगारातील बसेस वीस आणि एकवीस अशा दोन दिवसाकरिता देण्यात आल्याने मुरुड तालुक्यातील प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. या दोन दिवसात लांब पल्ल्याच्या सर्व फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. अशा आशयाचे पत्र आगार व्यवस्थापक राहुल शिंदे यांनी जाहीर केले आहे.यामुळे आज प्रवास करणाऱ्या स्थानिक  प्रवाशी, विद्यार्थ्यांना प्रचंड हाल सहन करावे लागले. 

        प्रशासनाच्या कार्यक्रमासाठी सर्वसामान्यांना परवडणारी लाल परी तिचा वापर अशा प्रकारे केला गेला असल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. मुरुड आगारातून सुटणाऱ्या मुंबई, बोरवली, कल्याण, ठाणे, भांडुप, शिर्डी, स्वारगेट, धुळे, पनवेल या फेऱ्या रद्द केल्याचे सूचना पत्र काढून जाहीर केले. त्यामुळे या अचानक रद्द केलेल्या बसेस मुले प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहे तसेच या वेळेमध्ये शालेय विद्यार्थ्यांचेही प्रचंड झाले तर दररोज प्रवास करणाऱ्यांना मिळेल त्या वाहनाचा आधार घ्यावा लागला.

        अशाप्रकारे कार्यक्रमांसाठी नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रशासनाने वेठीस धरले आहे. त्याचबरोबर या वेळेत प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रचंड झाले आहेत त्यामुळे प्रवाशांमध्ये अनेक नागरिकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर