कोर्लई,ता.२१(राजीव नेवासेकर)ठाणे येथील युथ फाऊंडेशनतर्फे मुरुड तालुक्यातील बेलीवाडी येथील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनानिमित्ताने दप्तर व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
युथ ऊर्जा फाऊडेशनचे संस्थापक अध्यक्षा वैभव खैरेसर यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना दप्तर वाटप केले.
युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष वैभव खैरे, प्रितम राजिवले गणेश मोरे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेश वाघमारे शाळा व्यवस्थापन समिती अध्यदा सदस्य, पालक वृंद कार्यक्रमास उपास्थित होते . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक अनंता भले,सुलभा कातवारे,अंगणवाडी सेविका शितल नांदगांवकर यांनी परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या