कोर्लई,ता.१६(राजीव नेवासेकर) पर्यटनात प्रसिद्ध असलेला मुरुड तालुक्यातील काशिद बीच पावसाळ्यात दोन महिन्यांसाठी बंद करण्यात आलेला काशिद बीच सुरू करण्यात आल्याचे विविध स्टॉल्स धारकांना कडून सांगण्यात आले.
पर्यटनात जगाच्या पटलावर नावारूपाला आलेला मुरुड तालुक्यातील काशिद बीच पावसाळ्यात दोन महिने बंद करण्यात आला होता.
काशिद बीच समुद्रकिनाऱ्यावरील विविध खाद्यपदार्थ, खाद्यपेय स्टॉल्स दरवर्षीप्रमाणे पावसाळ्यात यंदा दि.१८जून ते दि.१४ ऑगस्ट २०२४ या कालावधीत बंद ठेवण्यात आले होते. पावसाळ्यानंतर दि.१५ ऑगस्ट रोजी काशिद बीच सुरू करण्यात आल्याने पर्यटकांना पर्यटनात आनंद लुटता येणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या