कोर्लई,ता.२२(राजीव नेवासेकर) गेल्या अनेक वर्षांपासून रायगड जिल्ह्यात लायन्स क्लब सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असून लायन्स क्लबच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविणार असल्याचे प्रतिपादन लायन्स क्लब ऑफ श्रीबाग सेंटेनिअल अध्यक्ष ॲड.डॉ.के.डी.पाटील यांनी मुरुड नगरपरिषदेच्या प्राथमिक शाळेत वह्या वाटप कार्यक्रमाप्रसंगी केले.
मुरुड जंजिरा लायन्स क्लबतर्फे एम.जे.गणात्रा यांच्या सहकार्याने एन.जे.एफ.लायन विजय वनगे मान्यवरांच्या हस्ते मुरुड नगरपरिषदेच्या प्राथमिक शाळा क्र.२ मधील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.
सुरुवातीला सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात येऊन श्री सरस्वती देवीला पुष्पहार अर्पण करण्यात येऊन मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात येऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
लायन्स क्लब ऑफ श्रीबाग सेंटेनिअल अध्यक्ष लायन ॲड.डॉ.के.डी.पाटील, रिजनल चेअर पर्सन लायन विजय वनगे, लायन्स क्लब ऑफ मुरुड जंजिरा अध्यक्ष मकरंद कर्णिक, शाखा अध्यक्ष सनी सोगांवकर, माजी तहसीलदार लायन नयन कर्णिक, नगरपरिषद प्रशासन अधिकारी दिपाली दिवेकर, माजी नगरसेवक पांडुरंग आरेकर, अंजुमन इस्लाम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.साजिद शेख,प्रदीप बागडे, प्राथमिक शाळा क्र.२ चे मुख्याध्यापक दिनेश भोईर, सायली गुंजाळ, प्रिती सैदाणे, शशिकांत किंबहुने यावेळी उपस्थित होते.यावेळी विजय वनगे, दिपाली दिवेकर, मकरंद कर्णिक, साजिद शेख आदी.नी आपले विचार मांडले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांना लायन्स क्लब तर्फे मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सायली गुंजाळ यांनी केले.प्रास्ताविक मकरंद कर्णिक यांनी तर दिनेश भोईर यांनी आभार मानले.
________________________________________
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या