कोर्लई,ता.१५(राजीव नेवासेकर) मुरुडच्या वसंतराव नाईक महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे हर घर तिरंगा कार्यक्रमांतर्गत महाविद्यालय विकास समिती व प्राचार्य डॉ.जे.के.कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालय परीसरात वृक्षारोपण करण्यात आले.
वसंतराव नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे.के.कांबळे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.एस.एस.भैरगुंडे,प्रा.जी.डी.मुनेश्वर,प्रा. डॉ.एम.पी.गायकवाड,प्रा.डॉ.एस.एल.म्हात्रे,प्रा.डॉ.एन.एन.बागूल,प्रा.डॉ.सिमा नाहीद,प्रा.सिद्धेश सतविडकर,प्रा.प्रणव बागवे, संदेश दांडेकर,मुहीत हसवारे, श्रीकांत पालशेतकर, गणेश लाड, अच्युत पोतदार शिक्षकेतर कर्मचारी वृंद तसेच संकेत निकम, तन्वी माळी,साईली कवळे,दक्षा बैले, धृती सुतार, अंकिता रणदिवे,रिया पवार, ईश्वरी चव्हाण स्वयंसेवक व स्वयंसेविका यांनी हर घर तिरंगा कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयाच्या परीसरात शोभेची व नारळाची झाडे लावण्यात येऊन वृक्षारोपण करण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या