Type Here to Get Search Results !

मुरुडच्या वसंतराव नाईक महाविद्यालयात युवा दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर

 

कोर्लई,ता.१४(राजीव नेवासेकर) जागतिक युवा दिनानिमित्ताने मुरुडच्या वसंतराव नाईक महाविद्यालयात, ग्रामीण रुग्णालय रेडरिबन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने वैद्यकीय अधीक्षक डॉ.उषा चोले यांच्या मार्गदर्शनाखाली वसंतराव नाईक महाविद्यालयात आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.

    वसंतराव नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे.के.कांबळे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.जी.डी.मुनेश्वर,प्रा.डॉ.एस.एस.भैरगुंडे, ग्रामीण रुग्णालयाच्या समुपदेशक पूजा तोंडले, प्रयोग शाळा तंत्रज्ञ समीर धांडुरे, प्रयोग शाळा तंत्रज्ञ (HLL) स्नेहल विरकुड, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

    सुरुवातीला सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात येऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.यावेळी युवा दिनानिमित्ताने प्राचार्य डॉ.जे.के.कांबळे यांनी शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे असे सांगून रक्त गट, हिमोग्लोबिन,थॉयराईट बाबत माहिती दिली.

    यावेळी मुरुड ग्रामीण रुग्णालयाच्या समुपदेशक पूजा तोंडले, प्रयोग शाळा तंत्रज्ञ समीर धांडुरे व स्नेहल विरकुड यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची रक्त गट हिमोग्लोबिन थॉयराईट,एचबीएसएजी आदी.तपासणी करण्यात आली.या शिबिराचा ६५ जणांनी लाभ घेतला.सुत्रसंचलन प्रा.डॉ.जी.डी.मुनेश्वर तर प्रा.डॉ.एस.एस.भैरगुंडे यांनी आभार मानले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर