Type Here to Get Search Results !

अखिल भारतीय भंडारी समाजाचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा व मार्गदर्शन शिबीर संपन्न

कोर्लई,ता.१(राजीव नेवासेकर)मुंबई -दादर येथील अखिल भारतीय भंडारी समाज महासंघातर्फे  "विद्यार्थी गुणगौरव समारंभ व विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी "लक्ष्य अकादमीच्या" माध्यमातून विद्यार्थी गुणगौरव सोहळा व मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न झाले.

       प्रसिद्ध उद्योजक सुधीर भरडकर यांनी अनुभव कथन करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर शुभेच्छा दिल्या. भारतीय हवाई दलात सार्जंट पदावर काम करून देशासाठी योगदान देणारे मिलिंद नर्से यांनी लष्कर सेवेमध्ये कशा संधी उपलब्ध आहेत व त्या अनुषंगाने कुटुंबातील सर्व घटकांना कसा फायदा होतो यांची माहिती दिली. त्याबाबत काही माहिती हवी असल्यास त्यानी आपला भ्रमणध्वनी क्रमांक विद्यार्थ्यांना दिला. लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा विविध क्षेत्रातील सामान्य अध्ययनाची सात हजारावर व्याख्यान देणारे व्याख्याते, लक्ष्य अकादमीचे प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक वसीम खान यांनी लोकसेवा आयोगाच्या परिक्षा माध्यमातून सरकारी नोकरीत राहून जनसेवा करण्याबरोबरच राष्ट्र सेवेचा विस्तारीत मार्ग विद्यार्थ्यांना मिळू शकतो.याची जाणीव करुन दिली. लाकसेवा आयोगाच्या सेवेमध्ये मुलींना तीस टक्के आरक्षण असून त्यांना उत्तीर्ण होण्यासाठी गुणांची मर्यादा मुलांपेक्षा कमी असते. मुलींना उत्तीर्ण होण्याची उत्तम संधी या क्षेत्रात असते. खाजगी नोकरीत वेतन भरघोस मिळत असले तरी यंत्राप्रमाणे काम करावे लागते. मानसिक ताण पडतो. वरिष्ठांचे दडपण असते. विशष म्हणजे शाश्वत नोकरी नसते. ऐन उमेदीच्या वेळी आपली नोकरी जावू शकते. त्यानंतर जर तुम्ही सरकारी नोकरी करायचा विचार केलात तर तुमचे वय निघून गेलेले असते. याची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली तसेच स्पर्धा परीक्षेसाठी काही माहिती हवी असल्यास त्यांनी लक्ष्य अकादमीच्या कार्यालयास भेट द्यावी .तेथे लक्ष्य अकादमीचे संचालक भंडारी समाजबांधव अजित पडवळ आपणास माहिती देण्यास उपलब्ध असल्याने समाज बांधवांना सवलतीच्या दरात प्रवेश मिळेल.असे सांगितले.विद्या विकास शिक्षण संस्था व स्वामी समर्थ शिक्षण संस्थेचे सचिव समारंभाचे प्रमुख पाहुणे.विकास राऊत यांनी विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात गुगलच्या माध्यमातून भविष्य घडविण्याचा मार्ग सोपा झाल्याचे सांगितले. कोणत्याही विद्यार्थ्यांस महाविद्यालयात प्रवेश मिळण्यास अडचण येत असल्यास त्यांना प्रवेश मिळवून देण्याची जबाबदारी घेतली. शारदा एज्युकेशन सोसायटीचे सर्वेसर्वा, कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष, महासंघाचे विश्वस्त व समारंभाचे अध्यक्ष डॉ.प्रा.प्रदीपजी ढवळ यांनी तीन सुत्रानु‌सार विद्यार्थी यशस्वी होवू शकतो. हे सोदाहरण पटवून दिले. विद्यार्थ्यांनी प्रथमतः स्वतःला ओळखावे हे सूत्र समजावून सांगताना त्यांनी महामानव भागोजी कीर व अमिताभ बच्चन याचा जीवनपट उलगडवून सांगितला तसेच स्वतःचे अनुभव विद्यार्थ्यांना कथन केले. स्वतःची ओळख स्वतःला झाल्यावर आपण आपले आवडीचे क्षेत्र निवडावे आणि त्या क्षेत्रात एका जिद्दीने यश मिळवावे, ध्यास घ्या, नकारात्मक विचार सोडून द्या, माणूस माणून जगा प्रतिभावंत व्हा फक्त मार्क मिळवून भविष्य घडविता येणार नाही तर यासाठी काही तडजोडी जीवनात कराव्या लागतील.त्याची तयारी ठेवावी.असा कानमंत्रही विद्यार्थ्यांना दिला. त्यांनी महासंघालाही सुचना केली की मार्गदर्शनाचे शिबीर हे पूर्ण दिवसाचे ठेवावे, जेणेकरून विद्यार्थ्यांनी निवडलेल्या क्षेत्राची त्यांना चांगली माहिती मिळू शकेल.असे सांगीतले.यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

    या समारंभात तिमिरातून तेजाकडे या संस्थेच्या माध्यमातून कोकणात लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे सत्यवान रेडकर व गीतकार पांडुरंग तथा पपा पाटकर यांचा सत्कार मुर्तीचा विशेष सन्मान करण्यात आला. महासंघाने बारावी, पदवी-पदव्युत्तर व विशेष प्राविण्य मिळविलेल्या गुणवंताना निशुल्क आजीव सभासदत्व बहाल केले. मान्यवरांचे स्वागत व सन्मान महासंघाचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर यांनी केले. संस्था राबवित असलेल्या उपक्रमासोबतच भविष्यात रोजगार स्वयंरोजगार, होतकरू कलाकारांना नाट्य सिरीयल यामध्ये व्यासपिठ उपलब्ध करून देणे व गरजवंतांना परवडणा-या किमतीत घरे देण्याचा संकल्प महासंघाने सोडल्याचे सुतोवाच सहसचिव वैभव तारी यांनी आपल्या प्रास्ताविकात केले. या समारंभास विद्यार्थ्यांसोबत पालक व समाज बांधव यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.संतोष मांजरेकर व शशांक पाटकर यांनी समारंभाचे आयोजन उत्तम प्रकारे केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शलाका पांजरी, युवराज शिरोडकर, सहदेव सातर्डेकर, गणेश तळेकर, धनंजय कीर, प्रशांत पाटकर, किशोर बागकर, निशा भांडे, निशा मुणगेकर, विलास कौर, मोहन आवरेकर, गणेश साखरकर, किशोर मयेकर यांनी विशेष परिश्रम घेतले तर सुत्रसंचालन सुदर्शन केरकर यानी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर