कोर्लई,ता.२४ (राजीव नेवासेकर)मुरुड रोहा इंदापूर मार्गावर खार आंबोली येथे शेकडो वर्षे जुने असलेले वडाचे झाड आज पहाटे सहाच्या सुमारास कोसळल्याने या मार्गावरून होणारी वाहतूक ठप्प झाली आहे.सुदैवाने जिवित व वित्त हानी टळली आहे.
या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्ग रोह्याकडे जाणारा केळघर मार्गाने वळविण्यात आली आहे. तर इंदापूर, माणगाव, म्हसळा कडे जाणाऱ्या वाहतुकीला राजपुरी मार्गे वळविण्यात आले आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभाग, मुरुड नगरपरिषद प्रशासन व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने दोन जेसीपी सह हे भले मोठे वडाचे झाड हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या