Type Here to Get Search Results !

स्पर्धेच्या युगात करिअरच्या दृष्टीकोनातून संधींचा लाभ घेण्यासाठी कठोर परिश्रम काळाची गरज : प्रांताधिकारी मुकेश चव्हाण



खारेपाट.२५(महेंद्र म्हात्रे) विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर अभ्यासासाठी करावा स्पर्धेच्या युगात वेळ वाया न घालवता करिअरच्या दृष्टिकोनातून अनेक संधी उपलब्ध आहेत मात्र त्याचा लाभ घ्यायला हवा त्यासाठी अभ्यासात कठोर परिश्रम मेहनत घेणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन प्रांताधिकारी मुकेश चव्हाण यांनी अलिबाग तालुक्यातील तिनविरा विद्यालयात व्ही जी पाटील फाउंडेशन खिडकीतर्फे आयोजित कार्यक्रमात  दहावी व बारावी विद्यार्थ्यांचा गुणगौरव व करिअर मार्गदर्शन करताना केले.

     स्टॅंडर्ड चार्टर्ड बँकचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि चिफ कंप्लायन्स अधिकारी विनोद पाटील साहेब, हास्य प्रबोधनकार आणि कार्पोरेट ट्रेनर संजीवन म्हात्रे साहेब, व्ही जी पाटील एज्युकेशनल फाऊंडेशनचे मुख्य विश्वस्त आणि सामाजिक कार्यकर्ते आल्हाद पाटील आणि त्यांची सर्व टिम, रायगड जिल्हा माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष तावडे,दैनिक पुण्य प्रताप चे कार्यकारी संपादक अविनाश पाटील, मुख्याध्यापक अनंत गायकर, कबड्डी चे आंतरराष्ट्रीय पंच प्रसन्न कुमार पाटील, सामाजिक कार्यकर्ते आणि विश्वस्त वैभव पाटील, पालक ,शिक्षक वृंद, विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

     खारेपाटातील विद्यार्थ्यांना करिअरच्या दृष्टिकोनातून विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन मिळावे व सर्व स्तरातील विद्यार्थ्यांची प्रगती व्हावी ह्याच उद्देशाने अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञ व अनुभवी मान्यवरांना बोलावून त्यांच्या मार्गदर्शनाची संधी आंम्ही इथे देत असतो. असे आल्हाद पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगून त्यांचे वडील शिक्षणतज्ज्ञ व माजी मुख्याध्यापक स्व. वासुदेव गणेश पाटील यांचे शैक्षणिक सामाजिक क्रिडा क्षेत्रातील योगदान व कार्य पुढे नेण्यासाठीच या संस्थेची स्थापना केली असल्याचे सांगून त्यांच्या स्मृती जागृत केल्या.यावेळी स्टॅंडर्ड चार्टर्ड बँकचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री विनोद पाटील, संजीवन म्हात्रे, संतोष तावडे मान्यवरांनी आपले विचार मांडले.

 यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना इंग्रजी शब्दकोश व व्याकरण पुस्तक, फोल्डर ,पेन आणि सन्मानचिन्ह व गुलाब पुष्प देऊन विविध मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येऊन पुढिल यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक आल्हाद पाटील यांनी तर मुख्याध्यापक अनंत गायकर यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर