कोर्लई,ता.२४(राजीव नेवासेकर) मागील आठवड्यापासून पडत असलेल्या जोरदार पावसाने मुरुड शहरासह तालुक्यातील जनजीवनावर परिणाम दिसून येत असून तहसीलदार, वनविभाग, सेतू तसेच परेश हॉटेल, मारुती नाका ते एकदरा रस्त्यावर खड्डे पडून साचल्याने वाहनचालकांना वाहने चालवताना कसरत करावी लागत होती.मुरुडमध्ये दि. 23जुलै2024 रोजी 63 मि.मि.पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत 2011 मि.मि.पावसाची नोंद झाली आहे.
गेल्या आठवड्यापासून तालुक्यात जोरदार पाऊस पडत असून कोर्लई, बोर्ली,बारशिव, काशिद, नांदगाव मजगांव भागात रस्त्यावर काही ठिकाणी पाणी साचले होते.पावसामुळे तहसीलदार वनविभाग सेतू कार्यालय परेश हॉटेल मारुती नाका ते एकदरा रस्त्यावर खड्डे पडून पाणी साचल्याने तालुक्यातून विविध ठिकाणांहून येणाऱ्या नागरिक व वाहनचालकांना त्रास सहन करावा लागला.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या