कोर्लई,ता.२०(राजीव नेवासेकर)गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर वाढला असून रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. मुरुड तालुक्यात मागील आठवड्यापासून पावसाने दमदार जोर धरला असून पावसाने शहरातील सखल भागात पाणी साचले, मुरुड-अलिबाग रस्त्यावर राजवाडा जवळ नाले बंद झाल्याने रस्त्यावर पाणी येऊ लागले आहे. याचा दैनंदिन जीवनावर व वाहतूकीवर परिणाम दिसून येत होता.
भारतीय हवामान विभागाने पुढील 24 तासात रायगड या जिल्ह्यात काही ठिकाणी अति मुसळधार पावसाचा इशारा दिला असून नागरिकांनी सतर्क राहावे. असे मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून कळविण्यात आले होते.
मुरुडमध्ये दि. 20जुलै2024 रोजी 95 मि.मि.पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत 1855 मि.मि.पावसाची नोंद झाली आहे.
फणसाड व आंबोली धरण परिसरात चांगला पाऊस झाल्याने धरण भरून वाहू लागले आहेत.तालुक्यातील साळाव, बोर्लीं, मांडला, काशिद, नांदगाव मजगांव, मुरुड, आगरदांडा,राजपूरी भागात जोरदार पाऊस पडत आहे.विहूर नदीला भरपूर प्रमाणात पाणी आले, राजवाडा नजीकच्या रस्त्यावर असलेले धबधबे कोसळत होते तसेच शहरात काही ठिकाणी पाणी साचले होते,रात्री पासूनच कोसळणाऱ्या धुव्वाधार पावसाने शहरासह तालुक्यातील जनजीवनावर परिणाम दिसून आला.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या