कोर्लई,ता.२०(राजीव नेवासेकर) मुरुड तालुक्यातील काशिद-चिकणी येथील बालपणापासून स्पर्धा परीक्षेची आवड असलेला रायगड जिल्हा परिषदेच्या काशिद प्राथमिक शाळेचा इ.५ वी. तील विद्यार्थी कु.श्रेयस योगेश खेडकर याने शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेत मुरुड तालुक्यात तृतीय क्रमांक पटकावला याबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे. काशीद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश नांदगावकर ,स्कॉलरशिप तज्ञ नरेश पाकले व प्रमोदिनी म्हात्रे तसेच कटाक्षाने लक्ष देणारे वडील योगेश खेडेकर व त्याची आई सौ.जान्हवी खेडेकर यांचे श्रेयस ला मोलाचे मार्गदर्शन लाभले, त्याने मिळवलेल्या यशाबद्दल तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सुनिल गवळी,केंद्रप्रमुख दिनेश म्हात्रे,सर्व शिक्षकवृंद, काशिद ग्रामपंचायत, शालेय व्यवस्थापन समिती, काशिद चिकणी ग्रामस्थ, समाजातील विविध मान्यवरांकडून अभिनंदन व कौतुक होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या