Type Here to Get Search Results !

वांगणी येथे जलद बुद्धिबळ स्पर्धा दि.४ऑगस्ट रोजी


  कोर्लई,ता.१९(राजीव नेवासेकर) कर्जत -वांगणी पुर्व येथील ज्ञानेश्वर मंगल कार्यालय येथे रविवार दि.४ ऑगस्ट रोजी सकाळी १०-००वा.अग्रवाल बुद्धिबळ सीझन 2  बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.

      वांगणी येथे येथील रेल्वे गेट जवळ ज्ञानेश्वर मंगल कार्यालय येथे खुल्या व वयोगटानुसार आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय जलद बुद्धिबळ सामन्यात स्पर्धेच्या विजेत्यांना एकुण २००००/- रुपये रोख बक्षिसे मिळणार आहे. स्पर्धा खुला गट, १५ वर्षाखालील गट, ११ वर्षाखालील गट आणि ८ वर्षाखालील गट अश्या ४ गटात होणार असून रोख बक्षिसांच्या व्यतिरिक्त एकूण १४ आकर्षक ट्रॉफी आणि ६० मेडल्स तसेच सर्वोत्कृष्ट महिलासाठी रोख रक्कम आणि ट्रॉफी आणि ६ वर्षाखालील सर्व खेळाडूंना उत्तेजनार्थ मेडल देण्यात येणार आहेत.

     तरी स्पर्धकांनी नाव नोंदणीसाठी तसेच अधिक माहितीसाठी सुमित अग्रवाल - मोबाईल नंबर ०९१७५९१०३६०, गुरुजितसिंग मोबाईल नंबर ०७९७२३९३३७७ या नंबरवर संपर्क साधावा.असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर