कोर्लई,ता.१९(राजीव नेवासेकर)मुरुड मधील सुभाषचंद्र बोस मार्गावरील अभिषेक बंगला येथील भारतीय जनता पार्टीच्या संपर्क कार्यालयात शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या ऑफ लाईन अर्ज वाटप व ऑनलाईन अर्ज भरण्याचा शुभारंभ भारतीय जनता पार्टीचे दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी सभापती दिलीप उर्फ छोटमशेठ भोईर यांच्याहस्ते ज्येष्ठ नेते जनार्दन सदाशिव तथा आण्णा कंधारे यांच्या आयोजनाखाली मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
सुरुवातीला सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात येऊन मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.रायगड जिल्हा आदिवासी संघटनेचे अध्यक्ष वाघमारे यांनी शासनाच्या सर्व योजना व मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची मार्गदर्शनपर सविस्तर माहिती दिली.
यावेळी उपस्थित महिला लाभार्थींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे अर्ज भरुन ऑनलाईन अर्ज अपडेट करुन देण्यात आले.यावेळी शहरासह तालुक्यातील तालुक्यातील ६० लाभार्थींचे ऑनलाईन तर ३० लाभार्थींचे ऑनलाईन अर्ज अपडेट करण्यात आले.
भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश म्हात्रे, जिल्हा सरचिटणीस महेंद्र चौलकर,बाळा भगत, प्रविण बैकर, अभिजित पानवलकर,स्वप्नील चव्हाण,हनिफ उलडे, नरेश वारगे, सुधीर पाटील,नयन कर्णिक, राजाराम ठाकूर,साळाव सरपंच वैभव कांबळी,सोशल मीडिया अध्यक्ष सुरेंद्र गिरणेकर,तालुका महिला अध्यक्षा कल्पना अहिरे, कोषाध्यक्ष लताताई दाभणे, अल्पसंख्याक तालुका महिला अध्यक्षा नसिम उलडे,सिमा कंधारे,मेघा कुलकर्णी,नैनिता कर्णिक,प्रतिभा गायकर,श्रद्धा गायकवाड,विद्या मसाल,लिना मसाल,यामिनी गायकवाड,मंदा कासेकर, कोमल कोर्लईकर,तारा वाघमारे यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या