कोर्लई,ता.१९(राजीव नेवासेकर ) नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे मुरुड व रोहा तालुक्याला जोडणारा अवघ्या बत्तीस कि.मी.अंतर सर्वात जवळचा (शॉर्टकट) समजल्या जाणाऱ्या रस्त्यावर गारंबी केळघर दरम्यान ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडून काही ठिकाणी रस्ते वाहून, मोऱ्या खचून पार दैना झाली असून उखडलेल्या रस्त्यामुळे येथून जाणाऱ्या वाहनचालकांना वाहन चालविण्यात कसरत करावी लागत असून गेले कित्येक वर्षे हा रस्ता होत नसल्याने याकडे संबंधित बांधकाम खात्याच्या दुर्लक्षा बाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.
मुरुड गारंबी पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी शनिवारी,रविवार विकेंडसाठी तसेच सुटीच्या दिवशी पर्यटकांची रेलचेल असते.मुरुड-जंजिरा पर्यटनात हे ठिकाण मुंबई, पूणे या केळघर मार्गे मुरुडला येणाऱ्या पर्यटकांना सोयीचे असल्याने या मार्गावर वर्दळ वाढली आहे. स्थानिकांना देखील या मार्गाने मुरुड-रोहा-मुरुड असा प्रवास सोयीस्कर पडत आहे. परंतु या मार्गावर अरुंद रस्ते, अवघं वळणं व घाट रस्ता आहे. त्यामुळे वाहन चालकांना सावधगिरी बाळगावी लागते.
या मुरुड गारंबी केळघर रस्त्यावरील खड्डे, ठिक ठिकाणी खचलेल्या मोऱ्या असल्याने वाहन चालविणे धोकादायक बनले असून वेळप्रसंगी अपघाताची शक्यता लक्षात घेऊन शासनाच्या संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी यात लक्ष पुरवून लवकरात लवकर रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावेत. अशी मागणी जोर धरीत आहे
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या