कोर्लई,ता.२०(राजीव नेवासेकर) अन्य व्यवसाया बरोबरच पावसाळ्यात छत्री दुरुस्ती व्यवसायाकडे पुरक व्यवसाय म्हणून पाहिले जात असून पावसापासून संरक्षण करण्यासाठी छत्र्यांना अधिक प्राधान्य दिले जाते, त्यातही एकदा छत्री घेऊन ती. दुसऱ्या वर्षांच्या पावसात दुरुस्त करून वापरणा-यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे सुरू झालेल्या पावसात छत्र्या दुरुस्त करणाऱ्यांच्या व्यवसायात वाढ झालेली आहे. छत्रीची तार बदलण्यासाठी तीस ते चाळीस रुपये मोजावे लागत आहेत, तर दांडा बदलून घेण्यासाठी ऐंशी ते नव्वद रुपये मोजावे लागत आहेत. छत्री दुरुस्तीसाठी विविध लागणा-या साहित्याच्या किमतीत यंदा ५० टक्क्याने वाढ झाली आहे.
सध्या छत्र्यांमध्ये अनेक प्रकारच्या छत्र्या उपलब्ध असतानाही जुन्या छत्र्या दुरुस्त करून वापरणाऱ्यांचीही संख्या कमी नाही, 'जुने ते सोने' म्हणत अनेक जण या छत्री दुरुस्त करणायांच्या व्यवसायालाही नकळतच हातभार लावीत आहेत. छत्री दुरुस्तीच्या व्यवसायातून पावसाळ्यात दिवसाला रोजगार मिळून कष्टाचे चीज होते.असे रेवदंडा येथील छत्री दुरुस्तीचा पारंपारिक व्यवसाय करणारे विजय बाबासाहेब गोळे यांनी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या