कोर्लई,ता.२५(राजीव नेवासेकर)रोहा तालुक्यातील कोलाड परिसरातील जोरदार पावसाने थैमान घातल्याने कुंडलीका नदीने व महिसदरा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून रोहा ,गोवे गाव, आंबेवाडी समर्थ नगर संभे येथील गौरी नगरमध्ये घराघरात शिरले. पाणी उडदवणे मार्गावर आल्याने पालदाड पुल वाहतुकीस बंद ठेवण्यात आला. थाटाव एम आय डी सी कंपनीत पहिल्या पाळीला जाणारे कामगार माघारी परतले. तसेच मोठी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अधिक पाणी वाढण्याची शक्यता असून नदी काठांवरील गावांना भोंगा वाजवून प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रोहा- कोलाड मार्गावर व पाले खुर्द नजीक मार्गावर देखील पाणी आल्याने वाहतूक बंद असल्याचे समजते.
भारतीय हवामान विभागाने पुणे ,रत्नागिरी, ठाणे अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तरी नागरिकांनी सतर्क रहावे. व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. मंत्रालय मुंबई यांनी कळविले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या