Type Here to Get Search Results !

नांदगावमध्ये कराटे प्रशिक्षण व ब्लॅक बेल्ट पदविका परीक्षा * आशुतोष दंडवते,अनिह जोशी, ध्रुव कळके, अमोघ दळवी यांना ब्लॅक बेल्ट प्रदान

कोर्लई,ता.२१(राजीव नेवासेकर)मुरुड तालुक्यातील नांदगाव येथे ओकिनावा शोरीन रियू कराटे डो उडेन टी कोबुजुत्सू असोसिएशनच्या वतीने क्योशी  विजय चंद्रकांत तांबडकर आणि साहाय्यक प्रशिक्षक रेंन्शी अभिषेक गजानन तांबडकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण शिबीर व ब्लॅक बेल्ट पदविका परीक्षा घेण्यात आल्या. 

      याशिबिरात मुंबई व रायगड जिल्ह्यांतील खेळाडूंनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. यामध्ये मुंबईतील आशुतोष शेखर दंडवते, नांदगाव येथील अनिह भालचंद्र जोशी आणि अमोघ समित दळवी तसेच मजगाव येथील ध्रुव शिल्पा कळके यांनी चमकदार कामगिरी करून ब्लॅक बेल्ट पटकाविला.

  ब्लॅक बेल्ट पटकावणारे सर्व विद्यार्थ्यांनी यापूर्वी जिल्हा, विभाग व राज्य पातळीवर स्पर्धेत पदक मिळाले असून अमोघ समित दळवी याने राष्ट्रीय पातळीपर्यंत मजल गाठली आहे. त्यांच्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून गावातील क्रीडा प्रेमिंकडून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर