कोर्लई,ता.१८(राजीव नेवासेकर)मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील कराटे प्रशिक्षक मास्टर अभिषेक गजानन तांबडकर यांना त्यांच्या कराटे क्षेत्रातील यशस्वी कारकीर्द व कौशल्य आधारे ओकिनावा शोरीन रियू कराटे डो, उडेन टी कोबुजुत्सू असोसिएशनच्यावतीने मान्यवरांच्या हस्ते ५वी डिग्री रेंन्शी बेल्ट व पदवी देऊन सन्मानित करण्यात आले.
सुल्तान बथेरी, केरळ येथे ओकिनावा शोरीन रियू कराटे असोसिएशनच्या मुख्यालयात नुकतेच विशेष प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले. यामध्ये ग्रांन्ड मास्टर हन्शी के. पी. रविंद्रन (आशिया खंड प्रमुख) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या प्रगत शिबिरात असोसिएशनच्या वतीने त्यांची प्रात्यक्षिके तपासून व त्यांची कराटे क्षेत्रातील प्रदिर्घ यशस्वी कारकिर्द पहाता त्यांना ५ वी डिग्री रेंन्शी बेल्ट व पदवी प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.त्यांच्या या यशाबद्दल क्योशी - विजय चंद्रकांत तांबडकर व असंख्य त्यांच्या चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या