कोर्लई,ता.१८(राजीव नेवासेकर)अदानी फाउंडेशन दिघी पोर्ट लिमिटेड आणि हेल्पेज इंडिया यांच्या माध्यमातून मुरुड तालुक्यातील आगरदांडा ग्रामपंचायतीत मोबाइल हेल्थ केअर युनिट उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा मुख्यत्वेकरून गावकऱ्यांना गाव पातळीवर आरोग्य सुविधा मिळावी तसेच मोफत औषध सर्वांना मिळावी करिता मोफत फिरता दवाखाना उपक्रम अदानी फाउंडेशन दिघी पोर्ट लिमिटेड आणि हेल्पेज इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आगरदांडा ग्रुप ग्रामपंचायत चे प्रथम नागरिक आशिष हेदुलकर, ग्रामसेवक सुशांत ठाकूर सदस्य युसुफ अर्जबेगी, नरेंद्र हेदुळकर, नारायण शिवणे, माधवी खोत, रुपाली चिंदरकर, सरिता जाधव, जयश्री मोरे, सर्व समाज अध्यक्ष, सर्व आशासेविका व अंगणवाडी सेविका, अदानी फाउंडेशन डेप्युटी प्रोजेक्ट मॅनेजर जयश्री काळे, अवधूत पाटील, हेल्पेज इंडिया टीम आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामपंचायतीचे सरपंच आशिष हेदुलकर यांनी अदानी फाऊंडेशन दिघी पोर्ट लिमिटेड कंपनी कडून अतिशय स्तुत्य उपक्रम राबविला जात असून सर्वांनी या आरोग्य सुविधेचा लाभ घ्यावा.असे सांगितले. ग्रामसेवक सुशांत ठाकूर यांनी ग्रामस्थांच्या हिताचा विचार करून आरोग्य सेवा सुरू केली याबद्दल अदानी फाउंडेशनचे आभार व्यक्त केले तर अदानी फाउंडेशनच्या वतीने असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात ग्रामपंचायतीचे नेहमी सहकार्य मिळेल असे यावेळी सांगितले. जयश्री काळे यांनी दिघी पोर्ट लिमिटेड सदैव गावकऱ्यांच्या सेवेशी तत्पर असून भविष्यात आवश्यक असणारे विविध उपक्रम गाव पातळीवर राबविण्यात येईल.असे आपल्या मनोगतात सांगितले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामसखी प्राजक्ता अडुळकर यांनी अथक परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामसेवक सुशांत ठाकूर यांनी केले तर आभार युसुफ अर्जबेगी यांनी मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या