Type Here to Get Search Results !

कोकण मराठी साहित्य परिषदेची वर्षा सहल : मुरुड, रोहा,पाली,तळा तालुक्यातील साहित्यिकांनी लुटला सहलीचा आनंद !

 

कोर्लई,ता.८(राजीव नेवासेकर)कोकण मराठी साहित्य परिषद तळा मुरुड यांचे संयुक्त विद्यमाने शनिवार व रविवार दि.4 व 5 जुलै 2026 रोजी तळा तालुक्यातील महुरे येथील स्मिहील फार्म हाऊस येथे साहित्यिक वर्षासहल आयोजित करण्यात आली होती.यात २४ साहित्यिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.

          या वर्षा सहलीमध्ये बहारदार कवी संमेलन,कराओके गायन,साहित्यिक खेळ व पोहण्याचा मनमुराद आनंद घेण्यात आला.या वर्षा सहल कवी संमेलनात पाऊस,जीवन,

ईश्वर,नातीगोती,प्रेम,आभाळ अशा विविध विषयांवर कवींनी उत्तम रचना सादर केल्या.अध्यक्षस्थानी कोमसाप रायगड जिल्हा अध्यक्ष संजय गुंजाळ होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा समन्वयक रायगड भूषण सुखद राणे,नवी मुंबई महापालिका सहाय्यक आयुक्त शिक्षण विभाग दिपाली दिवेकर व पाली शाखा अध्यक्ष धनंजय गद्रे गुरुजी उपस्थित होते. कवी संमेलनाचे तळा शाखा, साहित्यिक खेळ मुरुड शाखा व कराओके गायन रोहा शाखेने उत्तम प्रकारे नियोजन केले होते.

    वर्षासहल यशस्वी करण्यासाठी कोमसाप रोहा शाखाध्यक्ष संध्या दिवकर,सचिव विजय दिवकर,तळा शाखा अध्यक्ष संदीप जामकर,सचिव कृष्णा कांबळे, रायगड जिल्हा ग्रामसेवक युनियनचे उपाध्यक्ष उमाजी माडेकर,कवयित्री उल्का माडेकर,रायगड जिल्हा युवाशक्ती प्रमुख सिद्धेश लखमदे,हेमंत बारटक्के यांनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर