Type Here to Get Search Results !

जागतिक पर्यावरण दिनी गारंबी धरणाची स्वच्छता : मुरुड नगरपरिषदेचा स्तुत्य उपक्रम


मुरुड,ता.८(पांडुरंग आरेकर) जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मुरुड नगरपरिषदेतर्फे स्वच्छता मोहीम राबविण्यात येऊन गारंबी धरण व परिसर स्वच्छ करण्यात आला.

    स्वच्छता हा विषय मानवी आरोग्याच्या व सार्वजनिक आरोग्याच्या सुरक्षितेच्या दृष्टीकोनातून आवश्यक असल्याने त्याची जनजागृती करण्याच्या हेतूने स्वच्छता मोहिम राबविण्यात आली तसेच मुरुड जंजिरा शहरामध्ये पाणी पुरवठा होणाऱ्या नबाब कालीन गारंबी व नवदार धरणाच्या पाणी पुरवठा क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने पाहणी करण्यांत आली. 

 मुरुड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा आराधना दांडेकर ,पाणी पुरवठा सभापती पांडुरंग आरेकर , मुख्याधिकारी सचिन बच्छाव यांच्याहस्ते या स्वच्छता मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला .या स्वच्छता मोहिमेत महिला व बालकल्याण सभापती नगमाना खानजादा,नगसेवक विजय ( नाना) पाटील,आदेश दांडेकर,नितीन आंबुर्ले,श्रीकांत खोत,ॲड.रुपेश पाटील नगरसेविका प्रिता चौलकर,श्रध्दा अपराध, प्रमिला माळी,पाणी पुरवठा अभियंता सोनल पाटील,प्रणाली शिंदे,अनिकेत जगदाळे,अनिकेत वाझे,सतेज निमकर, वनस्पती अभ्यासक प्रविण चौलकर,पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी प्रसाद जाळगावकर,राजेश भायदे,निलेश काते,संजय बामुगडे,सचिन पाटील, अमोल रणदिवे,अक्षता तुळस्कर,रुपेश पाटील,पल्लवी पडवळ,स्वप्नजा विरकुड,नम्रता करडे कर्मचारीवर्ग या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर