Type Here to Get Search Results !

मुरुड एसटी आगाराच्या विरोधात जनतेचा आक्रोश ! तहसीलदार यांना दिले विविध समस्यांचे निवेदन

कोर्लई,ता.६(राजीव नेवासेकर)मुरूडच्या एसटी आगारातील नादुरुस्त असलेल्या एसटी बसेस तात्काळ कायम स्वरुपी बंद करण्यासाठी मान्यवर नागरिकांनी  राज्याचे परिवहन मंत्री यांना देण्यासाठी एक निवेदन तहसीलदार आदेश डफळ यांना देण्यात आले.

   सुरुवातीला नगरसेवक ॲड.रुपेश पाटील यांनी एसटी बसेसची दुरावस्था तहसीलदार आदेश डफळ यांच्या कडे मांडली. नगरसेवक ॲड. रुपेश पाटील,ललीत जैनकुणाल सतविडकर,जाहिद फकजी, जनार्दन कंधारे,भारत रांजणकर, राजेंद्र कजबजे,,अनंत जोशी, सुशील ठाकुर,अजित गुरव,अजित कासार,विशाल कोलवणकर,उमेश भोईर, माॅन्टी दांडेकर,महेश मानकर, स्वप्निल कवळे उपस्थित होते.

निवेदन असे म्हटलं आहे की, एसटी आगारातील रोजच्या रोज एसटी बसेस रस्ता बंद पडत आहेत. जनतेला अतिशय वाईट दर्जाची सुविधा मुरुड मधील नागरिकांना देण्यात येत असुन या बससेवेसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांची अवस्था पुर्ण पणे नादुरुस्त असुन सतत काहीना काही विपरीत परिणाम त्यांचे दिसुन येत आहेत.

मागील काही दिवसांत गाडी रस्त्यात बंद पडणे वाहनांचे चाक निखळुन पडणे फाटलेला टायर गाडीस लावणे ,चालक वाहक उपलब्ध नसणे वाहन कधीच वेळेवर न सुटणे अश्या अनेक समस्यांने मुरूड आगारास व्यापलेले आहे.याबाबत समाजातील अनेक नागरिकांनी भेटी गाठी केल्या,बैठाका केल्या त्यासाठी केवळ आश्वासन मिळालेले असुन कारवाई मात्र शुन्य आहे.कदाचित भविष्यात यांचा विपरीत परिणाम म्हणून जनतेमध्ये असंतोष निर्माण होण्याची व सदरचा बिनकामाचा डेपो बंद करण्यासाठी कायदा हातात घेण्याची वेळ जनतेवर येण्याची शक्यता आता अधिक निर्माण झाली आहे.

मुरूड अलिबाग रस्त्याची आधीच दयनीय असुन त्याकरिता होणारा त्रास आणि वेळेचा अपव्यय आपल्याला माहीती आहेच तसेच येणारा काळ पावसाळ्याचा असुन सदरची परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता आहे.थोड्याच दिवसांत शाळा सुरू होणार असून या एसटी बस सेवेवर ग्रामीण भागातील जनता व विद्यार्थी अवलंबून असुन यांची संख्या सुध्दा अधिक आहे.याही बाबींचा आपण गांभीर्याने विचार करावा व मुरुड मधील सर्वात जास्त गंभीर व सतत वाढत चाललेल्या समस्येचे निराकरण करण्यासाठी संबंधित अधिकारी यांना आपल्या दालनात बोलवुन जनतेचा समक्ष बैठक आयोजित करावी.असे निवेदनात म्हटले आहे. 

तात्काळ मुरूड तहसीलदार आदेश डफळ यांनी आपल्या भ्रमणध्वनी व्दारे आगार व्यवस्थापक राहुल शिंदे यांना फोन करुन एसटी दुरावस्था संदर्भात मुरूडच्या जनतेचं निवेदन आलं आहे.

तरी समस्येचे निराकरण करण्यासाठी आपण येत्या दिनांक १०/०६/२०२६ रोजी तहसीलदार कार्यालया बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. असे सकारात्मक उत्तर मुरूड तहसीलदार आदेश डफळ यांनी जनतेला दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर