कोर्लई,ता.२२(राजीव नेवासेकर) मुरुड तालुक्यातील नांदगाव येथे सर्व सोयींनी युक्त, न्यूज १८ चॅनलने गौरविण्यात आलेले रायगड जिल्ह्यातील पहिले ISO प्रमाणित शंभर बेड क्षमतेच्या आयुष हॉस्पिटलमध्ये राज्य शासनाच्या आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य (AB-PMJAY) व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य (MJPJAY) व मुख्यमंत्री सहायता निधी योजनांना मंजुरी देण्यात आली असून अलिबाग -मुरुड मतदार संघाचे कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्याहस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत सोमवार दि.२५ मे २०२६ रोजी सकाळी ११-०० वा.या योजनांचा भव्य शुभारंभ सोहळा संपन्न होणार आहे.
मुरुडसह तालुक्यातील नांदगाव मजगाव पंचक्रोशीतील नागरिकांनी या सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन ॲल्टस गुड प्रायव्हेट लिमिटेड संचलित आयुष हॉस्पिटलच्या संचालिका डॉ नूतन माळी यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या