Type Here to Get Search Results !

नांदगावच्या स्टेट बँकेत सर्व्हर बंदमुळे दैनंदिन व्यवहारावर परिणाम : ग्राहकांची होतेय ससेहोलपट

कोर्लई,ता.२१(राजीव नेवासेकर) गेल्या चार दिवसांपासून मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत सर्व्हरवर बंद असल्याने यांचा दैनंदिन व्यवहारावर परिणाम होत असून देवाणघेवाण होत नसल्याने ग्राहकांना मुरुड गाठावे लागत असून ससेहोलपट होत आहे.

 याबाबत आमच्या प्रतिनिधीने कानोसा घेतला असता, राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळातर्फे रेवस -रेड्डी समृद्धी महामार्गाचे काम सुरु असून यात साळाव -मुरुड रस्त्यावर मो-या आणि रस्त्याच्या कामात याठिकाणी असलेली भारत संचार दूर निगम लिमिटेड (बी.एस. .एन.एल.) ची केबल अनेक ठिकाणी तुटल्याने याचा नेटवर्क वर परिणाम होऊन सर्व्हर बंद झाले असल्याने शासनाच्या विविध योजना लाडकी बहिण, पैशाची देवाणघेवाण करण्यासाठी नांदगाव मजगाव पंचक्रोशीतील ग्राहकांना मुरुड गाठावे लागत असून त्रास व हाल सहन करावा लागत आहे.

  भारतीय स्टेट बँकेच्या वरीष्ठ अधिकारी वर्गाने यात तातडीने लक्ष पुरवून योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर