Type Here to Get Search Results !

नांदगावच्या आयुष हॉस्पिटलमध्ये विविध योजनांचा लाभ घेण्याचे संचालिका डॉ.नूतन माळी यांचे आवाहन


 कोर्लई,ता.१९(राजीव नेवासेकर) मुरुड तालुक्यातील नांदगाव येथे सर्व सोयींनी युक्त, न्यूज १८ चॅनलने गौरविण्यात आलेले रायगड जिल्ह्यातील पहिले ISO प्रमाणित शंभर बेड क्षमतेच्या आयुष हॉस्पिटलमध्ये राज्य शासनाच्या आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य (AB-PMJAY) व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य (MJPJAY) योजनांना मंजुरी देण्यात आली असून तालुक्यांतील तसेच ग्रामीण भागातील जनतेने या सुविधेचा अधिकाधिक लाभ घ्यावा.असे आवाहन संचालिका डॉ नूतन माळी यांनी केले आहे.

  राज्य शासनाच्या आरोग्य विभागातर्फे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना सुरु करण्यात आयुष हॉस्पिटलला मान्यता मिळाल्याने अलिबाग, मुरुड- जंजिरा, श्रीवर्धन, रोहा तसेच रायगड जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून आर्थिक अडचणीमुळे उपचार घेणे कठीण असलेल्या रुग्णांना या योजनेद्वारे जनरल सर्जरी,मेडिसिन उपचार,ICU सेवा,अपघात व आपत्कालीन उपचार, स्त्रीरोग व प्रसुती सेवा, बालरोग उपचार,ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया,हृदय विकारावरील निवडक उपचार, कॅन्सरवरील उपचार,ENT व नेत्ररोग व न्यूरो संबंधित निवडक उपचार अत्यल्प दरात अथवा मोफत उपलब्ध होणार आहेत.

  या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, रेशनकार्ड (पिवळे-केशरी), आयुष्यमान कार्ड, मोबाईल नंबर, रहिवासी पुरावा, डॉक्टरांचे रेफरल किंवा वैद्यकीय कागदपत्रे, जुने मेडिकल रिपोर्ट (असल्यास), फोटो ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे.शिवाय या हॉस्पिटलमध्ये नवजात शिशू बालरोग तज्ज्ञ विभाग सुरु करण्यात आला असून गरिब १ते १६ वयोगटातील लहान मुलांना गंभीर आजारांवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत.गावोगावी मोफत उपचार सेवा उपलब्ध व्हावी. यासाठी मोबाईल युनिट सुरु करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली असून अशा विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन संचालिका डॉ नूतन माळी यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर