कोर्लई,ता.७(राजीव नेवासेकर) राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान – टप्पा क्र. १ अंतर्गत मुरुड तालुक्यातील मुरुड मंडळातील शिघ्रे येथे महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या अभियानाच्या अनुषंगाने गावोगावी जाऊन नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. तसेच शिबिरादरम्यान उपस्थित ग्रामस्थांकडून विविध शासकीय सेवांसाठी अर्ज स्वीकारण्यात आले व अनेक सेवांचा तात्काळ लाभ नागरिकांना देण्यात आला.
सदर शिबिरामध्ये महसूल विभागामार्फत खालील सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या –
उत्पन्नाचे दाखले - २६
वय व अधिवास प्रमाणपत्र -३२
डिजिटल सातबारा -४३७
डिजिटल ८-अ उतारा - ३५८
रेशन कार्ड -३८
आधार कार्ड अपडेट - २१
संजय गांधी निराधार योजना लाभार्थी नोंदणी-१०
निवडणूक विभागाच्या सेवा –
फॉर्म क्र. 6 (नवीन मतदार नोंदणी) १८
फॉर्म क्र. 7 (नाव वगळणे) २३
फॉर्म क्र. 8 (दुरुस्ती / स्थलांतर) २९
अशाप्रकारे या समाधान शिबिराला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरास शिघ्रे ग्रामपंचायतचे सरपंच, तेलवडे ग्रामपंचायतचे सरपंच, स्थानिक सामाजिक कार्यकर्ते तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी तहसीलदार आदेश डफळ यांनी नागरिकांना आवाहन केले कि, छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र समाधान शिबिर अभियान अंतर्गत पुढील शिबिर दि.१४ मार्च २०२६ रोजी नांदगाव येथे माळी समाज हॉल येथे आयोजित करण्यात आले आहे. नागरिकांनी या शिबिरामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन महसूल विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विविध सेवांचा लाभ घ्यावा. असे आवाहन केले.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या